Search
घर
- Vinita

- Feb 12, 2020
- 1 min read
सुंदर उंचशी मोहक फुलदाणी
ऐटीत उभी जणू महाराणी
शोभेचा तो स्वाभिमानी कोपरा..
मनोमन दात्याला हात जोडूनी
विश्वास आणि बुद्धिची मागणी
श्रद्धेचा तो दयाळू कोपरा..
चित्रातल्या शोधक डोळ्यांची पापणी
तिच्यात अडकलेले गहिरे पाणी
रंगीत तो हळवा कोपरा..
संगीत वाद्यांची आनंद गाणी
रोजची नवी भाव कहाणी
सुरेल तो हृदयातला कोपरा..
ग्रंथ संगणक वा दूरध्वनी
बुद्धीला असते धार प्रतिदिनी
ज्ञानाचा तो समृद्ध कोपरा..
घड्याळाची नित्य टकटकवाणी
हा कोपरा विसरेल का कोणी
काळाचा तो व्यवहारी कोपरा..
घरातल्या या सा-या कोप-यांनी
भरभरून दिले दोन्ही हातांनी
श्रीमंती का हो वेगळी याहूनी
सुखही हासले तिरक्या नजरेनी..
विनीता धुपकर
Comments