top of page
Search

सरीं

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 17, 2020
  • 1 min read

Updated: Feb 24, 2020

भिजलेल्या सरींना का


झेलतोस पंखावरी..?

नाही उरला आडोसा

निथळणा-या झाडावरी..l


फांद्या ओल्या चिंब

थरथरून न्हाल्या..

हिरवी वस्रे नेसण्यास

नव्याने तयार झाल्या..l


विनीता धुपकर

 
 
 

Comentarios


bottom of page