Search
काळ
- Vinita
- Mar 3, 2020
- 1 min read
कोण आहेस तू 'काळ'
काय आहे तुझं कूळ..?
अखंड पळत असतोस
लागल्यागत खूळ..
आम्ही तुझ्यापाठी पाठी
पकडत तुझ्या काट्याला..
कधी क्षणभर विश्रांति
नाहीच का या खेळाला..?
खेळताना कालांतराने
आम्ही थांबतो कधीतरी
तुझ्या प्रदक्षिणा युगांनुयुगे
अमूर्त आमरण अधांतरी..
आदि अंतातील अंतर
प्रारब्ध जाणतोस युगांत..
आम्ही अडकलो घटिका, पळे
आणि क्षणांच्या कोड्यात..
विनिता धुपकर
Commentaires