Search
चूक
- Vinita
- Feb 12, 2020
- 1 min read
शब्द होते अबोल
स्तब्ध होती शांतता
तुझ्या हाकेसाठी थांबणे
चुकले का मागणे?
सुंदर भव्य बंगल्यात
अनेक खोल्यांच्या जागेत
माझी स्वतःची जागा(स्पेस) असणे
चुकले का मागणे?
ढगांचा कर्कश्य गोंगाट
वीजेचे असह्य कडाडणे
मिठीत तूझ्या शांत व्हावे
चुकले का मागणे?
शब्दाने वाढलेला शब्द
अनोळखी झालेली नाती
वाटले आता थोडे थांबणे
चुकले का मागणे?
वाटे वळून बघता मागे
एक-एक पाऊल टाकत मागे
नसते का जमले माघार घेणे?
चुकलेच सगळे वागणे
Comments