Search
जीव
- Vinita
- Mar 3, 2020
- 1 min read
थकलेले जीव सारे
घेऊन मुठीत जीव
जगणे असले कसले
दाबून जगण्यातला जीव...
आज महागला कांदा
रडून कासावीस जीव
जगणे असले कसले
दाबून जगण्यातला जीव..
नको प्रवास धुळीचा
खोकून दमला जीव
जगणे असले कसले
दाबून जगण्यातला जीव..
पावसाने केली दैना
पूराने गिळले जीव
जगणे असले कसले
दाबून जगण्यातला जीव..
सत्तेसाठी घेतात इथे
एकमेकांचे जीव
जगणे असले कसले
दाबून जगण्यातला जीव..
जीव जीवास घाबरतो
वासनांचे बळी जीव
जगणे असले कसले
दाबून जगण्यातला जीव..
आभाळाशी एकरूप होऊन
निसर्गाशी एकजीव
होईल का जगणे असे
मोकळ्या श्वासातला जीव .?
विनिता धुपकर
Comments