top of page
Search

जखम

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 17, 2020
  • 1 min read

एक खोल जखम

ऊरी बाळगलेली..

एक दशकापासून

कुणा ना दिसलेली..


छातीवर हात ठेऊन

रोज जपते तिला..

एकांतात हळुवार हाताने

कुरवाळते तिला..


हल्ली तिच्यावर

खपली चढली होती..

वाटले आता ती

बरी होत होती..


पण धक्का लागलाच

कळ डोक्यात गेली..

खपली सारून जखम

पुन्हा वाहू लागली..


आयुष्यभर जपणे आहे

खूप खोल नि आत आत..

ठसठसती वेदना नेते

गहि-या डोहात...



 
 
 

Comentarios


bottom of page