top of page
Search

डोह

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 18, 2020
  • 1 min read

अवेळीच तेव्हा दाटला अंधारं

थैमान पावसाचे, सोसवेना भारं


तिच्या निळ्या डोळ्यांच्या डोही

चमकली वीज तरळत्या जळी..


करावे अवघडल्या प्रवाहा मुक्त

निळ्या डोहातून पाझरे दातृत्व..


थयथयाट पावसाचा, तांडव नाच

ऐकलीच नाही त्याने तिची साद..


जलाशयाच्या प्रवाही डोहांची आहुती

ढग आता मिटून डोळे, मूक आवंढे गिळती..


विनिता धुपकर

सप्टेंबर 2019 मधे पुण्याच्या विचित्र पावसाने वरील फोटोतील निळ्या डोळ्यांच्या माझ्या आत्येवहिनीचा बळी घेतला. त्या संदर्भात

 
 
 

Comentarios


bottom of page