top of page
Search

नाते

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 17, 2020
  • 1 min read

लक्ष लक्ष जुळली नाती

विणल्या रेशीमगाठी किती

पीळदार दोरांच्या झुल्यावर

उंच झोक्याची नाही भिती..


कधी असे मुरलेले लोणचे

चवदार तो दिवस जाई

मुरंब्याची फोड कधी

स्वप्नांच्या नगरीत नेई..


मिरची ठेच्याचा झटका

अपमानाचे पाणी डोळा

आईस्क्रीमचा गारवा वर

थंड आत्मा गाता गळा..


नवी दालने नव्या भेटी

नात्यांची चवदार भेळ

अनमोल ही शिदोरी

रंगला जगण्याचा खेळ


तिचे माझे नाते मात्र

सा-यांपेक्षा निराळे

जेवणानंतरचे पाणी जणू

नित्य उत्सव सोहळे


काळ्या दगडावरची रेघ

तशी रोजची तिची भेट

तिच्याशी सारे वाटून

हलके होते मन थेट..


दिसते आरशात रोज ती

माझ्याकडे पाहताना मला

माझ्यातली मीच ती

काय म्हणू या नात्याला?


विनिता धुपकर


 
 
 

Comments


bottom of page