Search
नाद
- Vinita
- Mar 3, 2020
- 1 min read
अनादि अनंत, अष्टविनायकाचा घंटानाद
भेटण्यास अधीर मन, ॐकाराचा अंतर्नाद..
हेरंब एकदंत वरदविनायक
मढ मंदिरी होई हर्षानाद..
ॐकाराचा अंतर्नाद..
विष्णू पूजितो सिद्धिविनायक
सिद्धटेकला पूण्यानाद..
ॐकाराचा अंतर्नाद..
सह्याद्रीच्या ह्रदयी गिरीजात्मज
लेण्याद्री पावन शिवानाद..
ॐकाराचा अंतर्नाद..
क-हेतिरी झंकार मयूरेश्वर
मोरगावी गा आरतीनाद..
ॐकाराचा अंतर्नाद..
रमा माधवाचा चिंतामणी
थेऊरासी स्वर प्रेमानाद..
ॐकाराचा अंतर्नाद..
बालका नाद बल्लाळेश्वर
पाली रमतो भक्तीनाद..
ॐकाराचा अंतर्नाद..
त्रिपूरासूर अंत महागणपती
रांजणगावी निनादे वीरनाद..
ॐकाराचा अंतर्नाद..
विघ्नासूर ये शरण विघ्नेश्वर
ओझरी चिर सुंदर शुभंनाद..
ॐकाराचा अंतर्नाद..
विनिता धुपकर
Comentarios