top of page
Search

पंख

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

आज पाखरा दाटलेल्या

मनाला मोकळं विहरायचंय

पाखरू होऊन तुझ्याशी

खूप काही बोलायचंय


येशील का अंगणी,

बसू दोघे झोपाळ्यावर

फिरवीन हळूवार हात,

रेशमी नक्षीदार पंखांवर


कुठून येते पंखांत बळ

आकाशात भरारी घेताना

आमची भरारी काव्य-चित्रात,

अडखळे उंबरा ओलांडताना


आळवतोस मुक्त स्वर,

विलंबित बंदिश गाताना

अचूक सम घरट्यात,

स्वैर रागात विहरताना..


इवल्याशा पंखांवर अवघे

आभाळ कसे तोलतोस

परतीची घरट्याची वाट

लक्षात कशी ठेवतोस

नेशील का तुझ्याबरोबर

आकाशात पंख पसरवून

शिकेन सारेच पहायला

उंचावरून, खूप खूप दूरून


विनीता धुपकर


 
 
 

Comments


bottom of page