Search
पैज
- Vinita

- Feb 12, 2020
- 1 min read
पैज लावली होती
मीच माझ्याबरोबर..
नाही कधी वाकणार
मोडेन हवी तर..
घातला होता गराडा
जेव्हा नात्यांनी..
गुंता अधिकच गुंतला
न सुटणा-या गाठींनी..
द्वंद्व सुरू झाले
माझे माझ्याशीच..
भावना आणि तत्व
दोन्ही माझीच..
मानली हार तत्वांनी
वाकले थोडीशी..
मोडली नाही मात्र
वीण नात्यांची..
विनीता धुपकर
Comments