Search
पणती
- Vinita
- Feb 17, 2020
- 1 min read
अशीच येते हीच दिवाळी
हसूनी नटूनी मज दारी
लक्ष लक्ष पणत्यांच्या रांगा
स्वागत करूया घरोघरी..
रांगोळीने या या म्हटले
कंदिल हा जोडूनी हात
उभ्या ठाकल्या पणत्या रांगेत
चकल्या करंज्या ताटात
दिव्यादिव्यांच्या प्रकाशवाटा
दिपवूनी टाकी घर सारे
घराबरोबर उजळूनी जाती
मनामनातले किती कोपरें
सारे सजले, घरही सजले
सौंदर्यही झाले सुंदर
सूरही वेडे निनादावले
रंगांची झाली उधळण..
काळोख पळे तनामनांतून
सोडूनी जागा हक्काची
प्रकाशमय परमानंदा तू
दे पावती मुक्कामाची
विनीता धुपकर
Comentários