top of page
Search

बिंदू

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

Updated: Mar 12, 2020

एक

बिंदू, एक कण

उगम अस्तित्वाचा

हिरव्या निसर्ग सृष्टीच्या

निर्मितीचा..

बिंदूच्या जोड-साखळीतील

रेषेतला

अनेक रेषांनी साकारलेल्या

आकारातला..

कालचक्रात फिरणाऱ्या

उत्पत्ती-लयाचा

अनंत रूपे परीधानणाऱ्या

ईश्वराचा..

अथांग ब्रह्मांडातील

पृथ्वीचा

कणाकणात जगलेल्या

आत्म्याचा..

चराचरात वसलेल्या

अद्वैताचा..

'नेति नेति ' मधील

वेदांताचा..

विनिता धुपकर


 
 
 

Comments


bottom of page