Search
भेट
- Vinita
- Feb 12, 2020
- 1 min read
पुन्हा भेटलो नव्याने,
हासलो नव्याने..
हासता हासताना,
भासलो नव्याने..
पुन्हा जगलो नव्याने,
भिडलो नव्याने..
जुनी मधाळ बाटली,
दिसली नव्याने..
नर्मदेच्या अथांगतेत,
डुंबलो नव्याने..
कैलास उत्तुंग शिखर,
चढलो नव्याने..
मला मीच काहीशी,
गवसले नव्याने..
नवशक्ती, नवी दिशा,
चालले नव्याने..
-विनीता धुपकर
Comments