top of page
Search

भेट

  • Feb 17, 2020
  • 1 min read

रोज सकाळी होते भेट

माझी अन् तुझी..

सांग ना रे मला,

दिसतेय मी कशी..?


न रागवता भेटतोस

दिसते कशी सांगत..

कधी खूप सुंदर आणि

कधी अगदीच बावळट..


चिडचिड होते माझी

तुझ्या स्पष्ट उत्तराने..

पण अपरिहार्य आहे

तुला रोज भेटणे..


तुझ्यातल्या मला पाहता

तू कधी दिसतच नाही..

*आरसा* खरा मित्र माझा

खोटे कधी बोलत नाही..


विनीता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page