top of page
Search

मेघ

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

कृष्णमेघ सावळा गगनी

आतुर भेटण्या राधेला..

वसुंधराधा रुसली आहे

दर्शन दे आता तिजला..


लखलख झालर विजेची

झगमग अंगरखा लेऊन

गरजत बरसत मेघाचे

आगमन आभाळातून..


चाहूल सख्याची येता

धरती झाली रोमांचित..

रिमझिम नुपूर झंकारले

काया भिजूनि पुलकित..


थेंबांच्या जलदांमधुनि

तो शिरला तिच्या गाभ्यात..

धरतीच्या धमन्यांमधुनि

रुजला मातीच्या गर्भात..


शहारली सर्वांगे अवनी

जाणिवा नावांकुराच्या

चैतन्यसरी पाझरती गात्री

नव्याने बहरण्याच्या..


अलवार लपेटून आली

हिरवा पदर शालूचा..

डोलत मेघाला मुजरा

इवल्या गोजि-या पानांचा..


विनिता धुपकर


 
 
 

Comentarios


bottom of page