Search
राधा
- Vinita

- Feb 18, 2020
- 1 min read
Updated: Feb 24, 2020
केतकीच्या वनी
उभी राधा बावरी..
सूर येई ना कानी
रुसली का बासरी...

थांबाव नाच मोरा
नको करूस तोरा...
येईल माझा कान्हा
लेऊन मोरपिसारा...
घंटेचा नाद
खूप दूर दूर..
जा रे वाऱ्या घेऊन ये
बासरीचे सूर
पाव्याचे सूर आले
वाहत वाऱ्यावर...
मोरपीस फिरले जणू
राधेच्या अंगांगावर..
शहारली राधा
जवळ येता घनश्याम ..
तना मनात श्याम
आत्मा राधे-श्याम ..
निरोप घेता हरी
राधेने हट्ट केला
तुझ्या प्रेमाचा स्पर्श
मोरपीस दे मला..
विनिता धुपकर
Comments