Search
राधा
- Vinita

- Mar 17, 2020
- 1 min read
हातात गुंतले हातं
श्वासात मिसळले श्वास
प्रणयाच्या सुरावटीवर
वेणूचा घुमतो नाद..
राधेचा गोरा वर्ण
सावळा कशाने झाला
त्या निळ्या माधवासंगे
सावळ्यात तो विरघळला
पाखरे गीत गुणगुणती
प्रेमाच्या धुंद स्वरांचे
कुठूनसे सूर ते भिनले
आसमंती मारव्याचे..
मोरपिशी बावरी राधा
स्पंदनात हरी-श्रीहरी
मुरली कान्हयाची वाजवी
राधा-राधा अधरावरी
विनिता धुपकर
Comments