top of page
Search

लहरी

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 18, 2020
  • 1 min read

सूर्य चंद्र पृथ्वी तारे

फिरते ब्रह्मांड नभांगणी

सागर पात्रातले अलवार

हिंदकळते जरासे पाणी..


फेसाळत लाटांच्या लहरी

लगबगीने नाचत येतात..

मनस्वी बिलगून वाळूला

किनाऱ्याला थेट भिडतात..


मानवाची मग्रूर लहर

बांधी इमले काठावर..

एक कठोर लहर लाटेची

राग तिचा अनावर..


ढासळती गर्वाच्या भिंती

बुडती घरे स्वार्थाची..

अंती काही अवशेष नुरे

घटिका आत्मनिरीक्षणाची..


सावरून तो उठतो पेलत

भव्य पर्वत वेदनेचा..

हात जोडुनी जीवनलहरीस

लावी दिवा संवेदनेचा..


विनिता धुपकर


 
 
 

Comments


bottom of page