top of page
Search

वाणी

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 12, 2020
  • 1 min read

परेशान आहेत सारे

माझ्या न बोलण्याने

मी मात्र हवालदिल आहे

आतल्या गोंगाटाने..


बोलणे जरा कमी करून

वाचते चेहरे आता..

किती किती बोलतात ते

काहीच न बोलता..


शब्दांमागून शब्द येतात

भावनेला घेऊन..

चेहराही मग बोलू लागतो

वाणीच्या मागून..


होतो मग वाद-संवाद

माझाच माझ्याशी

पुन्हा कधीतरी बोलू लागते

वाद नको वाणीशी


विनीता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page