Search
वेध
- Vinita
- Mar 3, 2020
- 1 min read
वेध मजला लागले
शब्द येता चारूचा
लेखणी सरसावली
उंच झोका स्वप्नांचा..
घालमेल मनीची
जीव आतूरलेला
कधी सरसर लिहिते
कागदावर कवितेला..
शब्दं फेर धरती
त्या एका शब्दाभोवती
मोहक रासलीला
गुंफून रेशीमगाठी..
वेध तुझे कविते
ध्यास आवरेना
अलवार अवतरते तू
कुठूनशी कळेना..
वेध आता भेटीचे
कवितांच्या प्रतिमांना
नविन वर्षा घेऊन ये
माझ्या सा-या सख्यांना..
विनिता धुपकर
Comments