Search
वेल
- Vinita

- Feb 18, 2020
- 1 min read
वेल नाजूकशी सांजवेळी
लाजत बघे त्याच्या भाळी
लावण्यवती डुले वा-यावरी
सा-यांचीच नजर तिच्यावरी
तिच्या मोहक रूपा भाळून
तटस्थ वृक्षही पाहे वळून
हलकेच जवळ घेतले त्याने
भोवती फेर धरले तिने..
जांभळ्या तिच्या फुलांतून
शहारत होता तोही आतून
येऊ लागली फुलपाखरे
त्याला रंगच नविन सारे..
बहरताना तिने वर पाहिले
आधाराला हात उचलले..
त्याच्या फांदीचे हात वाकले
झटकन तिने ते हात पकडले
फुलत होते प्रेम एकमेकांत
चर्चा नि कुतुहल सा-या वनात
वडाच्या मिठीत लाजली लताराणी
पाखरे गाऊ लागली प्रणय गाणी
विनिता धुपकर
Comments