top of page
Search

वळण

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

नागमोडी वळणे घेता

विसावले एका

वळणावर..

विसाव्याकडेही कधी

पाहिले नव्हते तोवर..

पाऊल न वाजवता

सख्या शाळेतल्या आल्या..

हळूच झाकले डोळे

ओळख बरे म्हणाल्या..

कसे विसरेन तुम्हां

मोरपीस माझ्या

आठवणींतले..

फरपटलेल्या वाटेवर अचानक

तुमचे हात गुंफलेले..

आयुष्याचे सुंदर वळण

जुने क्षण नव्याने वेचणे..

नव्या वेष्टनामध्ये

जुन्याच पेयाला

सन्मानणे ..

कुठे ठेऊ हा आनंद..?

हृदयाच्या कुठल्या

कुपीत.. ?

साऱ्यांनाच कळले आता

सख्यांचे हे गुपित..

नव्याने भेटलो, भेटत राहिलो

जुन्या कथांची पारायणे

करत राहिलो

शब्दांना नवी वळणे देत

नवे साज ल्यालों..

या सरत्या वळणावरही

तारुण्याने बहरलो..

खर सांगू, या आधी

इतक्या सुंदर नाही दिसलो..!


विनिता धुपकर


 
 
 

Comments


bottom of page