top of page
Search

साथ

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 17, 2020
  • 1 min read

शब्द होते अबोल

स्तब्ध होती शांतता,

एका निसटत्या क्षणी

हात होते हातात.

*साथ देण्यासाठी...*


उसळणारा तो समुद्र

नदीकाठी ही संथता,

रात्रीचे शीतल चांदणे,

प्रखर सूर्य तो तळपता.

*साथ निभावण्यासाठी...*


ढगांचा कर्कष्य गोंगाट

वीजेचे असह्य कडाडणे,

वेदनेचा वाहता पूर

वादळाचे घोंघावणे.

*साथ पेलण्यासाठी...*


बागडणारे फुलपाखरू

अलगद फुलणारे फूल,

कवितेचे खोल शब्द

गाण्याचे आतूर सूर...

*साथ न सुटण्यासाठी...*


निरभ्र विशाल आकाश

पक्षाच्या उंच झेपेसाठी,

सरितेचे विलीन होणे

सागराच्या भव्यतेशी.

*साथ घट्ट करण्यासाठी...*


विनीता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page