Search
सोनं
- Vinita

- Feb 12, 2020
- 1 min read
झेंडूच्या फुलांची
दारी सजली तोरणे..
आपट्याची झाडे
नाहिशी होताहेत म्हणे..
हिरवी पाने तोडुन
होते का सोन्याची लूट?
दुःखी पाने वाटून
राहते का मैत्री अतुट?
आज आपल्या मैत्रीने,
एक जरी लावले झाड,
बरसतील उद्या सुवर्णफुलं
सोनेरी असेल पहाट..
विनीता धुपकर
Comments