Search
समई
- Vinita
- Mar 3, 2020
- 1 min read
अशी एकटीच ती समई
उभी तटस्थ देव्हा-याशी
पिढी आली आणिक गेली
या डोळा पाहूनि घेशी
तेजस्वी नयन ज्योतीचे
उजळूनि टाकी गाभारा
तिमिराच्या मागे अंधुक
धूर काजळीचा आकारा
पापण्या हलविती डोळे
काजळी काजळ रेघा
डोळ्यांच्या नजरेमधुनी
पाझरे जिव्हाळा अवघा
स्मृती वातीसम सरकावून
वात्सल्य झिरपत आहे
मांगल्य तेजवीत भवती
ती अखंड तेवत आहे
पिढी जाता आणिक येता
उरी तीच प्रेम भावना
देव्हारा समई तीच
जाग्या तशाच संवेदना
विनिता धुपकर
Comments