Search
हाक
- Vinita

- Feb 18, 2020
- 1 min read
चंद्राने मारली हाक
चांदण्यांनो लवकर चला
किती वेळ लावता तुम्ही
निघताना आवरायला..
तांबडं फुटायची घटिका
जवळ आलीय बघा..
अरूण कोणत्याही क्षणी
दारात राहिल उभा..
चला चला सख्यांनो
चांदण्यांची कुजबूज..
गप्पा आता थांबवू
उद्या नक्की भेटूच..
कुठे गेली शुक्राची राणी
द्या हाक तिला..
चंदामामा कधीच
निघाला परतीला..
चांदण्या हातात हात घालून
गेल्या चंद्राच्या मागून..
सूर्याने निरोप दिला त्यांना
हाक पाखरांना मारून..
विनीता धुपकर
Comments