Search
आठवण
Feb 18, 2020
1 min read
कितीदा बजावले तिला
दार ठोठावून येत जा आत..
पण येते धाड्कन अवेळीं
आणि शिरते थेट घरात...
येताना एकटी येत नाही
आणते लपवून मैत्रिणी चार ..
भावना, आनंदीच्या मागे
कविता, माया ढकली दार..
येता तुम्ही अचानक आणि
मारता अशी घट्ट मिठी...
हसतो राग नि बोलतो अबोला
आपल्या तर जन्माच्या गाठी...
या सयांनो, उचला मोती
एकेक मोत्याची आठवण करीत.. .
सांडू नका गं, एकही मोती
ओवूया नात्यांच्या रेशीम-दोरीत..
विनिता धुपकर
Comments