top of page
Search

आर्णा....

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 17, 2020
  • 1 min read

पहिल्यांदा जेव्हा, हातांत तुला घेतले..

विश्वाचा आनंद, झेलतेयसे वाटले..


ओळखीचे पाहिलेस तू, नजरेत माझ्या..

चमकला प्रकाश उद्याचा, डोळ्यात तुझ्या. .


लोरीच्या सुरात, निवांत झोपलीस खांद्यावर ..

पेंगुळली रात्र, रेंगाळले सूर वा-यावर..


तुझ्या पहिल्या हुंकाराची, निष्पाप साद..

उमटले प्रतिहुंकार, विश्वासाची प्रतिसाद..


हास्यासमोर तुझ्या, सारी जिन्दगी कुरबान..

घर सारे हसले, जानमें आ गयी जान..


अशीच हसत रहा, रडू नकोस केविलवाणी..

हसवण्यासाठी तुला, आमच्या माकडचेष्टा, मर्कट वाणी..


आनंदाच्या लाटांवर, मोरपिसे झुलवित आलीस तू..

लक्ष्मीच्या नावाने, सरस्वतीच्या पावलांनी 'आर्णा'वलीस तू..


-नीताआज्जी


 
 
 

Comentarios


bottom of page