top of page
Search

आवेग

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 18, 2020
  • 1 min read

आज स्मृतींच्या ढगांनी

गर्दी केली आहे काळजात..

मन कधीच पोहोचले आहे

दूर दूर गतकाळात...


जेव्हा आले लग्नानंतर

सासरच्या दारात..

बाबा (सासरे) म्हणाले माझी

मुलगीच आली घरात...


पित्यासमान प्रेम

आणि केली माया..

सुख दुःखे वाटून घेतली

शीतल पितृछाया ...


मात्र संध्याकाळ त्यांची

नको इतकी लांबली..

दिर्घआयुष्य, दीर्घआजार

तना-मनाने हार खाल्ली...


आवेगाने विनवत होते ते

हात जोडून, देवा..

लवकर ने आता

मला तुझ्या गावा..


आजच्याच दिवशी त्यांना

देवाने घरी नेले..

मरण यातनेतून

शरीराला मुक्त केले..


आठवणींच्या आवेगाचा

बांध फुटतो आहे..

अश्रू आपल्या वाटेने

ओघळत आहेत..


आनंदी आयुष्य जगल्यावर

नको ही दीर्घायुष्याची वंचना...

नको हा आवेग मरण्याचा

नको अखेरीस ही याचना ..


विनिता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page