top of page
Search

क्षण

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

Updated: Mar 12, 2020

वहीमधले एकेक पान

आठवणींच्या क्षणांचे दालन

काही पाने अजून हिरवी

काही सुकलेली पानगळ..


सोनेरी हसरी

सुखद आठवणींचा ठेवा

त्यांच्या भरोशावर

आजचा दिवस उभा..


ते पान अजून ओले

अश्रूंनी भिजलेले

आजही काळीज

पुन्हा धडधडले..


काही वहीतून निसटलेली

जणू वहीने नाकारलेली..

धूसर सावळ्या आठवणींनी

आयुष्यातून निखळलेली ..


हृदयावर कोरलेले

त्या क्षणाचे हळवे पान

मिरवत राहिले उंचावून

आईपणाचा मान...


क्षण मुकुटावरच्या पिसांतला

आभाळाला भिडण्याचा

स्वतःवर खुश होण्याचा

सार्थकी जीवनाचा..


आताशा रमते मी

गतकाळातील पानांत..

उद्याची पहाट दिसते

आजच्या स्वप्नात..


आजचा हा क्षण होतो

दुसऱ्या क्षणी आठवण

स्मृतींची जपून पाने

जगते हा मुठीतला क्षण...


विनिता धुपकर



 
 
 

Comments


bottom of page