Search
गोडवा
- Vinita
- Mar 3, 2020
- 1 min read
Updated: Mar 12, 2020

किती गोडवा त्या हसण्यात
जणू सुखाचे तुषार अंतरात
किती गोडवा त्या सुरात
जणू देवांचा देव गळ्यात
किती गोडवा त्या शब्दात
जणू गुळाचा खडा मुखात
किती गोडवा त्या बोलात
जणू बाळकृष्ण आला घरात
किती गोडवा त्या स्पर्शात
जणू कापूस पिंजलेला ससाच
किती गोडवा त्या रंगात
जणू कुंचला इंद्रधनूच्या हातात
किती गोडवा त्या विचारात
जणू साखर पेरली मनात
*तीळगूळासारखे एकमेकांना धरून राहू आणि गोडवा वृद्धिंगत करू*
विनिता धुपकर
Comments