Search
चंदन
- Vinita

- Feb 12, 2020
- 1 min read
चंदनाच्या झाडास टेकून
उभी राधा बावरी..
सूर येई ना कानी
रूसली का बासुरी..?
चंदनी दरवळ होता
मोहून टाकित तिला..
डोळे मात्र वाटेकडे
कुठे कान्हा गेला..?
उद्यापासून सांगेन त्याला
वाजव चंदनाचीच बासुरी..
सुरांआधीच देईल गंध
चाहुल तुझी गिरीधारी..
विनीता धुपकर
Comments