जीवनVinitaMar 3, 20201 min readआकाशात फिरून त्यास कळले,आभाळ हे जीवन।पंखांनाही कुठून येई बळ हे,उड्डाण ते शोधून।नावेतून फिरून त्यास उमजे,आयुष्य हे सागर।ओहोटीस तरुन नेई भरती,मागोनि ये धावून।टांग्यातून फिरुन त्यास समजे,रस्ता असे दुस्तर।स्वप्नातून ऊठून काम करिसी,तो लोकलं गाठून।विनिता धुपकर
Comments