Search
टेकडी
- Vinita
- Feb 17, 2020
- 1 min read
चढलो आम्ही सा-याजणी वाघजाईच्या टेकडीवरी... हिरव्यागार वळणवाटेवर हिरवी कमान डोक्यावरी..
मस्त गाण्यांच्या तालावर मोराची साथ समेवरी.. सूर्य डोकावे झाडामागून पक्षांचे संगीत बरोबरी ..
चमत्कार हा या वळणावर गालिचा अंथरला जमिनीवरी.. हिरव्या पानांच्या नक्षीवर फुले पसरली गर्द केशरी..
वाटले निजावे गालिच्यावर बंध सोडूनी कधीतरी.. फेकूनी चिंता, फक्त असावे मैत्रिणींचे हात करी....
- विनीता धुपकर
Comments