Search
तुळस
- Vinita
- Feb 12, 2020
- 1 min read
वृंदावनातील तुळस
जशी आईची माया..
दारी स्वागता उभी
म्हणे हसूनी 'या या'..
लग्नादिशी सजते ही
हिरवी लेणे लेऊन..
भार्या होते विष्णूची
मांगल्य घरी घेऊन..
तुळशीबाई कधी असते
पावित्र्य प्रसादावरी..
कधी उपाय व्याधींवर
वनौषधींची राणी खरी..
कधी विराजमान पत्र
देवाच्या मुकुटावरी..
कधी देव होऊनी
जाणा-याच्या मुखावरी
विनीता धुपकर
Comments