Search
नक्षी
- Vinita

- Feb 17, 2020
- 1 min read
जेव्हा कळली गुंतागुंत,
शरिरातील धमन्यांची
ही तर होती नक्षी

फुलपाखरांच्या पंखांवरती
कुणी काढली नक्षी
डाव्यासम अगदी उजवे
वापरली का हो पट्टी?
हालतो झोका झाडावर
सुगरणीच्या खोप्याचा..
काड्यांची नक्षी सुंदर
बंगला झुले पिल्लांचा..
कोळ्याने जाळे विणले
धागे जगण्या-मरण्याचे
जीवांवर जीवही जगतो
जणू मंडल हे नक्षीचे
नटलेले किती रेखांनी
देवाचे जग हे सुंदर
अदभूत हे नक्षीकाम
तुजला निर्मात्या वंदन.
.
विनीता धुपकर
Comments