Search
पाऊस..
- Vinita

- Feb 12, 2020
- 1 min read
वाटेवर डोळे तुझ्या अन्,
वाजत गाजत आलास तू..
आलास वेळेत मित्रा तरी,
दाटलेला अवेळी वाटलास तू..
नेहमीचीच असते धावपळ,
साग्रसंगीत स्वागताची..
छत्रीत उगाच कोरडे राहून,
मन चिंब भिजवण्याची..
बघते तुला आभाळभर,
खिडकीत बसून तासनतास..
शहारून निघते सर्वांग,
ओल्या मनाच्या थेंबाथेंबात..
मनाची काच मी मग पुसते,
स्वच्छ स्वच्छ आतून..
तरी तिच्यावर धुके जमते
बघता तू डोकावून..
काचेच्या धुक्यावर मारते मी,
रेघोट्या तुला बघण्यासाठी..
पूरे असा हा लपंडाव,
समोर ये बरसण्यासाठी..
विनीता धुपकर
Comments