Search
पिंजरा
- Vinita

- Mar 3, 2020
- 1 min read
Updated: Mar 12, 2020

माझा विणलाय
पिंजरा स्वतःभोवती
नकळत रमले आहे
आतच अवती भवती..
नात्यांच्या बंधनांचा
उभ्या आडव्या तारांचा
दोन्ही हातांनी तार धरून
मधले जग पाहण्याचा..
तारा जोडून घुमटाकार
जणू मंदिराच्या कळसाचा
कड्यांचा किणकिण नाद
अध्यात्माच्या ओंकाराचा..
अंतरीच्या जाणीवांचा
छोटुकल्या झोपाळ्याचा
शीळ मारत कधीतरी
मस्त झोके घेण्याचा..
स्त्रीत्वाच्या मर्यादेचा
स्वत्वाच्या स्वभिमानाचा
जगाच्या नजरेपासून
नजर न लागण्याचा
भिंती पडण्याची भय नाही,
आभाळाच्या छप्पराचा..
आयुष्याच्या खुंटीला टांगलेला
अपेक्षांच्या जड ओझ्याचा..
विनिता धुपकर
Comments