top of page
Search

पैठणी

  • Feb 12, 2020
  • 1 min read

काळं बदलला, वेग धावला,

मागे टाकित पिढीला..

भावना मात्र तशाच ओल्या,

प्रेम लाजते प्रेमाला..


किती साड्या आल्या गेल्या,

मोहून टाकित सखीला..

हसली हळूच घडीतून ती,

तूच पैठणी हवी मजला..


विनीता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page