top of page
Search

पत्र

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 12, 2020
  • 1 min read

कुठे गेलाय पोष्टमन

कळत नाही का त्याला?

त्याने दिलेल्या पत्रातून

आई भेटणार आहे मला..


पत्रगप्पांना आता

किती दिवस लोटले

ठीक आहे ना आई गं,

घर आणि घरातले..?


गिरकी मारली हसून

लागला पत्राचा ठाव..

आता आज दिवसभर

हसू-रडूचा लपंडाव..


अंतरदेशिय पत्राचा

कोपरा-कोपरा ती लिही..

घडीतही दडलेली असत

छोटी अक्षरे अन् खूप काही..


आई हल्ली अशा भेटी

रोज भेटूनही होत नाहीत..

वरवरची खुशाली बोलतो

मनाशी मनाचा संवाद नाही..


अजूनही जपलीत पत्रे

आठवणींनी भिजलेली

स्मार्ट फोनच्या जगात

ओढ मात्र हरवली..


विनीता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page