Search
बंधन
- Vinita
- Feb 12, 2020
- 1 min read
आज जायलाच हवे का तुला..?
आत्ता कुठे मैफिल रंगतेय..
चित्र सर्वार्थाने आकार घेतेय..
अर्ध्यातूनच निघायला हवे का तुला..?
आज डोळे बोलताहेत..
मनातली साद ऐकू येतेय..
थोडे थांबून झेलता येईल का तुला..?
कोण जाणे उद्या कसा असेल..
नेहमीचा की अनोळखी भासेल..
ओळखीचा आज सजवता येईल का तुला..?
काळाच्या ओघात आयुष्य जखडलेय..
मोजक्या क्षणांचे मोती विखुरलेत..
बंधनाच्या धाग्यात ओवता येतील का तुला..?
आज जायलाच हवे का तुला..?
विनीता धुपकर
Comments