top of page
Search

भाकरी

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 3, 2020
  • 1 min read

लढा त्यांचा होता

भाकरीच्या तुकड्यासाठी

अंगभर कपड्यांसाठी आणि

चार भिंतीं छपरासाठी


दुःखाचा उन्हाळा अनेकदा

डोईवरून सरकला

चांदणे कितीदा आले तरी

भाकरीचा चंद्र नाही गावला


वाळलेच नाहीत कधी

अश्रू डोळ्यातले

हात हतबल एकमेकात

घट्ट अडकलेले


झगमगत्या मुंबापुरीतल्या

गिरणगावी मिट्ट अंधार

कंदिलातल्या बेईमान

वातीचाही बहिष्कार..


मिणमिणत्या प्रकाशातल्या

लांब लांब सावल्या

चमकणाऱ्या डोळ्यातल्या

आशेच्या बाहुल्या


विनिता धुपकर

( फोटो - साने गुरुजी प्रतिष्टान कलादालन, इंदापूर येथील गिरणी कामगारांच्या लढ्यावर आधारित एक भाकरीवर कलाकृती)


 
 
 

Comments


bottom of page