top of page
Search

वसंत

  • Writer: Vinita
    Vinita
  • Mar 18, 2020
  • 1 min read

सुकल्या झाडांना सजवाया

रूसल्या धरेला हसवाया

आला वसंत आला..


मधुगंधाची करित शिंपण

रसरंगाची करित उधळण

आनंद बरसत आला

आला वसंत आला....


फांद्यांवर पानांची बाळे

फुलाफुलांत अमृत प्याले

गुंफित चैतन्य माला..

आला वसंत आला....


पंचमात गाई कोकिळा

साजरा रंगोत्सव सोहळा

निळ्यात हिरवा ओला

आला वसंत आला....


त्याच्या प्रेमरंगात फुलला

तिच्या शहारण्यात लाजला

मिलनी अलवार बहरला

आला वसंत आला....


विनिता धुपकर


 
 
 

Comments


bottom of page