Search
शांतता..
- Vinita
- Mar 18, 2020
- 1 min read
कधी माझ्या डोळ्यात
उतरशील का हळूवार
नजरेचे दार देखील
न वाजवता, अलवार..
अजूनही दिसतंय
मृगनयनातलं चांदणं
नजरेतली आर्त साद
मनाला हेलावणं..
थकून स्वप्नचांदणी
निजली इथेच
बसून पालखीत आता
जाईल दूर देस..
तू येत रहा रोज
फुलांच्या समवेत
डोळे मिटताच सामोरी
माझ्या नजरेत..
ह्रदयाच्या स्पंदनातच
ठेवीन तुला आता
नाही चिंता हरवण्याची
नजरेलाही शांतता..
विनिता धुपकर
Comentarios