top of page
Search

संगत

  • Writer: Vinita
    Vinita
  • Feb 18, 2020
  • 1 min read

जन्मापासून संगत त्यांची

एका संथ मंद लयीत..

आवाज अगदी हळूवार

मलाही क्वचितच ऐकू येई ..


माझ्या सगळ्या जाणिवांचे

अगदी पहिले साक्षीदार

त्यांचा प्रवास माझ्यासोबत

जन्माचे असती साथीदार..


कधी छातीवर हात ठेऊन

आजमावते मी असणे त्यांचे..

कधी त्यांची तालबद्ध धडधड

दाखवून देते अस्तित्व माझे..


श्वासांशिवाय कोणीच

माझ्यासोबत नसेल ..

जन्ममरणातील अंतर

फक्त एक श्वास असेल..


विनिता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page