Search
साजण
- Vinita
- Mar 3, 2020
- 1 min read
मनाची सारी दालने
व्यापून साऱ्या जागा
हृदयंच गुंजन करिते
सजणा रे अनुरागा
सजले होते फक्त
लेऊन शालीन शेला
शृंगार केला होता
विद्यालंकार अकेला
निशेचे काजळ नयनी
चांदण्यांचा गजरा
मनांच्या खुल्या दारांतून
वाहे वसंत वारा
वाचतो तू लिहिलेले
डोळ्यांच्या पापण्यांवर
स्पन्दनांची लय कशी रे
जाई तुझ्या कानांवर
नाही शब्दांचे फवारे
नाही आतषबाजी
सुरात मिळुनी सूर
गझल जीवनाची
विनिता धुपकर
Comments