Search
हायकू
- Vinita

- Feb 17, 2020
- 1 min read
झोपली पाखरे झाडावर
बसल्या जागी डोळे मिटून
तोल कसा काय सांभाळून?
परतलं नाही पाखरू
नुकतच उडायला शिकलेलं..
घरटं नाही का सापडलं?
ऊन्हाचं येणं
पावसाचं थांबणं
थांबलं का घर वाहून जाणं?
कावळा काड्या वेचतोय
झाडावर घरटं बांधायला
पावसात वाहून गेलं वाटतंय..
सूर्य केव्हा येणार
ढगांना बाजूला सारून..?
आकाशाचा कंदिल उजळून..
कसे सांगायचे उंदिरमामाला
मागे बघ वळून..
मनी आहे दबा धरून..
विनीता धुपकर
Comments