top of page
Search

हायकू

  • Mar 3, 2020
  • 1 min read

आकाशाची उंच नीळाई

समुद्राची नीळी गहराई

मधे एक तटस्थ क्षितीज


एक लाट दुसरीला ढकलून

आली आणि गेली..

घाई का केली..?


प्रत्येक लाटेवर दिसतोय

सूर्य मावळताना

एकेकीचा निरोप घेताना


विनिता धुपकर


 
 
 

Comments


bottom of page