top of page
Search

रातराणी

  • Feb 12, 2020
  • 1 min read

कुठूनसा वा-याच्या

हातात हात घालून

मोहक सुगंध आलाय

वेडावतोय आतून..


गंधाचा मागोवा घेत

गेले मी दूर, खूप दूर

श्वासातला सुवास आणि

मनात थोडी हूरहूर


नागमोडी वाटेवर रात्री

कुंपणाजवळ वेल झुले

छोटुकली लपली होती

रातराणीची फुले..


रातराणीच्या फुलांनो

रात्री का तुम्ही जागता?

दरवळ ह्रदयात भिनवून

स्वप्नांच्या जगात नेता?


विनीता धुपकर

 
 
 

Comments


bottom of page